Home / Uncategorized / ॲड.काझींच्या एमएलसी साठी राष्ट्रवादी कार्यकर्ते एकवटले …!

ॲड.काझींच्या एमएलसी साठी राष्ट्रवादी कार्यकर्ते एकवटले …!

देऊळगाव राजा

आ.कायंदेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची घेणार भेट ….

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांची विधान परिषदेवर ( एम एल सी ) नियुक्ती करा या मागणीसाठी आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले असून या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष खांडेभराड यांनी दिली आहे.

नुकतेच स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड करा अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी आमदार मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते धनशीराम शिपने,हाजी म. सिद्दीक,प्रा.दिलीप सानप,प्रा.दिलीपकुमार झोटे,नगराध्यक्ष माधुरी शिपने,इरफान अली,ज्येष्ठ नेते भानुदास कोल्हे,देविदास ठाकरे,तालुका अध्यक्ष सदाशिव मुंडे, आदींनी सदर बैठकीत ऍड.नाझेर काझी यांना पक्षाने विधान परिषद एम एस सी वर संधी देण्या विषयी आग्रहाची मागणी करीत कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीने समजून घ्याव्यात अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी आमदार मनोज कायंदे म्हणाले पक्षाचे ज्येष्ठ नेते व ऍड. नाझेर काझी यांनी जिल्हा सह महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी केलेले प्रामाणिक कार्य, त्यांची पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याची तळमळ बघता त्यांना एमएलसी वर घेणे ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचे नेते अजित पवार हयात असताना आम्ही अनेक वेळा ही मागणी रेटून धरली, व दिल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनोकामना बघता लवकरच राज्याच्या उपमुख्यमंत्री, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार, त्याचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट येणार असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. ऍड.काझी यांची विधान परिषदेवर निवड करा या मागणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत नरहरी गवई,नितीन कायंदे,प्रा सुभाष दराडे, श्याम मेहत्रे,गणेश डोईफोडे,प्रदीप वाघ, राजेंद्र खांडेभराड,सुनील शेजुळकर,गजानन काकड,निलेश ठाकरे,दीपक चेके, शेख नाझीम,न प बांधकाम सभापती विष्णू झोरे,शिक्षण सभापती नमीरा शेख अतिक, सभापती वैशाली विकास कासारे, नगरसेवक म.असेल जनता सेवा,अफरोज बावा, गौरव गीते, ज्ञानेश्वर टेकाळे, निलेश गीते,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष अजगर शहा, अशपाक टेलर, महंमद रफीक, सतीश झिने, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार