Home / Uncategorized / क्रांती चौकात रंगली चार्ली चॅपलिन यांची १३७ वी जयंती; ज्युनिअर चार्ली फाउंडेशनचा अनोखा उपक्रम..!

क्रांती चौकात रंगली चार्ली चॅपलिन यांची १३७ वी जयंती; ज्युनिअर चार्ली फाउंडेशनचा अनोखा उपक्रम..!

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

वाहतुकिचे नियम तोडणाऱ्यांना चार्ली चाप्पिन यांनी गुलाब पुष्प देत क्रांती चौकात वाहनधारकांची जनजागृती केली

छत्रपती संभाजीनगर : जागतिक रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे महानायक सर चार्ली स्पेंसर चॅपलिन यांची १३७ वी जयंती आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ‘ज्युनिअर चार्ली फाउंडेशन’च्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन ज्युनिअर चार्ली च्या वेशभूषेत सोमनाथ स्वभावणे,व सुमित पंडित यांच्या वतीने करण्यात आले होते.

कलात्मक आदरांजली

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चार्ली चॅपलिन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी फाउंडेशनच्या वतीने कलाकारांनी चॅप्लिन यांच्या अजरामर मुद्रा आणि त्यांच्या सिग्नेचर स्टाईलचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.केवळ मनोरंजनच नव्हे, तर चॅपलिन यांच्या जीवनप्रवासातून मिळणारा संघर्षाचा आणि आनंदाचा संदेश या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.सामाजिक बांधिलकीचा वारसा ज्युनिअर चार्ली फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कला आणि सामाजिक कार्याची सांगड घालत आहे.जयंतीच्या या औचित्याने संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.”चार्ली चॅपलिन यांनी हसवता हसवता जगाला जगण्याचे तत्वज्ञान शिकवले,तोच वारसा पुढे नेण्याचा चार्ली फाउंडेशन चा प्रयत्न आहे,” अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.या सोहळ्याला शहरातील नागरिक, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कलाकारांना प्रोत्साहन दिले.क्रांती चौक परिसर काही काळासाठी चॅपलिन यांच्या आठवणींनी आणि हास्याने उजळून निघाला होता.स्वतःचे दुःख मनात ठेवूनही इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांच्या शैलीतून मुख अभिनय करत ‘ज्युनिअर चार्ली’ने उपस्थितांचे मन जिंकले.या कार्यक्रमाला उत्तरेश्वर मुंडे पोलीस उप निरीक्षक वाहतूक शाखा,संस्थापक अध्यक्ष सोमनाथ स्वभावणे,उपाध्यक्ष सुमित पंडित,कार्तीक वाघ, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी राहुल मस्के,अमोल ढवळे,तबसूम पठाण यांच्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे सुरक्षित प्रवास करावा

 – उत्तरेश्वर मुंडे पोलीस उप निरीक्षक वाहतूक शाखा,

 

संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे ‘ज्युनिअर चार्ली’च्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.चार्लीच्या वेशभूषेत सुमित पंडित आणि सोमनाथ स्वभावने यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये रस्ते वाहतूक सुरक्षा नियमांची जनजागृती केली.नियम तोडणाऱ्या नागरिकांना दंडाऐवजी गुलाबाची फुले देत वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार