छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
विहामांडवा: येथील आर.वाय.पी. कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
विहामांडवा येथील आर.वाय.पी.कला महाविद्यालय हे महामानवांची विचारधारा रूजवणारे महाविद्यालय असून उत्साही प्राचार्य डॉ. सुधाकर गिरे यांचे नेहमीच विविध उपक्रम महाविद्यालयात राबविण्यासाठी सक्रीय असतात. त्यानुसार महाविद्यालयातील मराठी विभाग हा नेहमीच अग्रेसर असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानवास विनम्र अभिवादन करत. विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील सामान्य ज्ञान स्पर्धा व “आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या विषयावरील निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक ज्ञानात भर टाकण्यासाठी असे उपक्रम मराठी विभागप्रमुख डॉ. संजय शिंदे सातत्याने महाविद्यालयात राबवत असतात. यावेळी महाविद्यालयीन कर्मचारी डॉ. अजय बढे, प्रा.विकास बेळगे, श्री गणेश करंगळ, श्रीदिनेश ससाणे, शरीफ शेख, ओम नवपुते, तसेच कु.पूजा डिक्कर, आश्विनी बढे, शुभांगी दहिफळे, मानसी जयस्वाल, श्वेता गंगथीरे, नम्रता मोरे, निकिता सोहळे , पालवे संदीप, इ. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.






