Home / Uncategorized / विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी..

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी..

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोळी बोडखा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या आनंदोत्सवात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप पोटफोडे व उर्दू माध्यमाचे अध्यक्ष जुब्राईल शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या नंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांनी भीमगीते सादर केली तसेच गाणी, भाषणे व नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या सर्व कार्यक्रमांना पालकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रभाकर हातागळे तसेच कोळी बोडखा ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी जमीर शेख उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष (मराठी माध्यम) गणेश ठोके, उर्दू माध्यमाचे उपाध्यक्ष फिरोज शेख, प्रभाकर ठोके, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक तुकाराम ढोले, तसेच शाळेतील शिक्षक आंधळे, ढवळे, शिक्षिका गंगथडे, तनवीर, सुमेरा मॅडम व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग आठवीतील विद्यार्थिनी समृद्धी ठोके हिने उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक इब्राहिम शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार