Home / Uncategorized / महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त वैजापूरात सार्वजनिक अभिवादन..!

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त वैजापूरात सार्वजनिक अभिवादन..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वैजापूर ता,११

शिव-फुले-शाहू-आंबेडकर समिती व सर्व थरातील नागरिक बंधू-भगिनी यांच्या वतीने शनिवार(ता.११) रोजी येथील महात्मा फुले पुतळा परिसरात  महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून

अभिवादन करण्यात आले.प्रथम वैजापूर -गंगापूर चे आमदार ना.प्रा.रमेश पा.बोरनारे,शहराचे प्रथम नागरिक व नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हा परिषदेचे व पंचायत समिती सदस्य, पालिका नगरसेवक, विविध संस्थानचे

पदाधिकारी, शिव- फुल-शाहूं -आंबेडकर समिती सदस्य, सर्व सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी वैष्णवी कविता अशोक देवकर या मुलीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर व सामाजिक,धार्मिक गीते आपल्या बँड पथकाद्वारे चाऊस ब्रास बँड यांनी सादर केली.शिव- फुले -शाहू -आंबेडकर समितीच्या वतीने विविध कार्यक्रम या निमित्ताने सम्पन्न झाले.शहरातील सर्व थरातील नागरिक व महिला ,लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार