छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,११/१२
तालुक्यातील ग्रामीण भागातील भग्गाव येथील नाभिक समाजाची किरण अशोक मंडळ(चव्हाण) या विद्यार्थीनीने अत्यंत हलाखीत जीवन जगून एम. ए.बी.एड, एम.फिल ,पीएचडी ही डॉक्टरेट पदवी प्राप्त करून ग्रामीण भागात गुणवत्ता असल्याचे सिध्द केले आहे.आई गुणवंताबाई मंडळ व वडील अशोक मंडळ याची अत्यंत गरिबीची परिस्थिती व व्यवसाय नाभिक परंतु या गरिबीवर मात करीत किरण अशोक मंडळ यांनी मराठी विषयात डॉ,बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता.साहित्यिक व आय.ए.एसअधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या “कथात्मक साहित्याचा अभ्यास”,
त्यांचे मार्गदर्शक येथील वि.पा .महाविद्यालयाचे मराठी चे प्राध्यापक डॉ. महेश खरात होते.किरण गुणवंताताई
अशोक मंडळ यांचे माध्यमिक शालांत विषयाचे शिक्षक सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत असून तिच्या या यशाबद्दल राजपूत यांनी तिचे अभिनंदन केले आहे






