Home / Uncategorized / वैजापूरचे धोंडीरामसिंह राजपूत बनले ‘प्रति गाडगेबाबा’; पैठणमध्ये स्वच्छतेचा संदेश..

वैजापूरचे धोंडीरामसिंह राजपूत बनले ‘प्रति गाडगेबाबा’; पैठणमध्ये स्वच्छतेचा संदेश..

 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वैजापूर/पैठण ता,२४

स्वच्छ शहर करण्याचा संदेश

“माझे शहर-पैठण शहर, स्वच्छ शहर -पैठण शहर,सुंदर शहर-पैठण शहर,स्वच्छता नांदे ज्या घरी -आरोग्य तेथे वास करी” स्वच्छता मंत्र गिरवू या-शहर स्वच्छ करू या”,स्वच्छता दूत गाडगे बाबा की जय,”गोपाला,गोपाला,देवकीनंदन गोपाला”असे भजन गात व वरील घोषणा देत वैजापूरचे प्रतिगाडगेबाबा यांनी पैठण शहरात तीन तास फिरत व जगोंजागी पथ नाट्य व बाबांच्या जीवनातील सजीव बोलके प्रसंग

घेत संपूर्ण पैठण शहरात संत गाडगेबाबांचा स्वच्छता संदेश पोहचवून पैठण शहरात संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या एकनाथ षष्ठी पूर्वी स्वच्छता जागृती केली.निमित्त होते सोमवार (ता.२३)असलेल्या स्वछतेचे जनक”संत गाडगे महाराज “यांच्या १५०ब्या जयंतीचे. धोंडीरामसिंह राजपूत यांच्या सोबत वैजापूरचे सेवा निवृत्त तलाठी अशोक आप्पा पवार व पैठण चे रेडिओ स्टार सुरेश जाधव व श्री पवार. पैठण शहर व तालुका संत गाडगेबाबा सार्वजनिक उत्सव समिती ने आयोजित कार्यक्रमाच्या स्वच्छता फेरीचा आरंभ नगराध्यक्षा विद्याताई भूषण कावसानकर व भूषण कावसानकर,उपनगराध्यक्ष  तुषार सूर्यभान पाटील,व नगरसेवक व उत्सव समिती सदस्य यांच्या उपस्थितीत नेहरू चौक ते अन्नपूर्णा नगर असे चार।कि. मी ,ची स्वच्छता फेरी काढून नागरिकांत स्वच्छता जागृती करण्यात आली.जिल्ह्याचे खासदार संदीपानजी  भुमरे,आमदार विलास बापू भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैय्या भुमरे तसेच माजी

नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राजू भाऊ गायकवाड,सूरज लोळगे ,अनिलजी पटेल यांच्या व विद्यमान नगराध्यक्ष विद्याताई कावसानकर, उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीने उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीने हा अभिनव उपक्रम नाथषष्ठी पूर्व स्वच्छता उपक्रम राबऊन शहर स्वच्छतेचे पाठ गिरविले. तीन तासानंतर ही स्वच्छता फेरी अन्नपूर्णा नगर येथे पोहचली तेथे जिपसदस्य शिवराज भैया भुमरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.धोंडीरामसिंह राजपूत व भुमरे यांनी बाबांच्या जीवनातील प्रसंग विशद करून

अंधश्रद्धा निर्मूलन,नवस पद्धत बंद करा, व्यसन व विकार त्यागा,मुला-मुलींना समान समजा,स्वच्छता पाळा, हुंडा पद्धत बंद करा असे आवाहन केले.या प्रसंगी नगरसेविका जयश्री गायकवाड, अलका परदेशी, संगीता मापारी,रूपाली सोनारे,कविता शिंदे,महेश पवार, वैशाली परदेशी स्नेहल तुपे,अनिता वीर,मंगलताई हिंगे,विलास अडसूळ,पंकज गायकवाड,रफिक भाई, हसनोद्दीन,सुनील रासणे यांच्या सह उत्सव समिती सदस्य महिला व पुरुष

मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार