Home / Uncategorized / समाजसेवेचा ध्यास; संभाजीनगरात गौ सन्मानासाठी एकजूट…!

समाजसेवेचा ध्यास; संभाजीनगरात गौ सन्मानासाठी एकजूट…!

लोक महाराष्ट्र न्यूज हेड:उमा जैवाळ 

काल छ.संभाजीनगर येथे “गौ सन्मान आवाहन अभियान” यशस्वी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थानी असलेल्या सौ. नीता ताई, सौ. छायाताई खरात आणि सौ. ललिताताई ठोंबरे  प्रीती ताई देशमुख उमाताई जैवाळ यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला.

या बैठकीत जिल्हा व नगर टीममधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौसंवर्धन, समाजजागृती आणि भारतीय संस्कृतीचे जतन यासाठी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

बैठकीदरम्यान गाईला “राष्ट्रमाता” दर्जा मिळावा, देशभरात गोहत्या पूर्णतः बंद व्हावी तसेच जनजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा ठोस निर्धार करण्यात आला.

या अभियानाच्या यशासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. एक सशक्त, संस्कारी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

🚩 भारत माता की जय

🚩 भारत की रक्षा हम करेंगे

🚩 भारत की सेवा हम करेंगे

🚩 जय श्रीराम… जय जय श्रीराम

🚩 धर्मो रक्षति रक्षिता…


समाजकार्याच्या अग्रस्थानी असलेले कट्टर समाजसेवक
श्री. उज्वल भाऊ गव्हाळ व श्री. रविभाऊ ठाकूर

यांच्या मार्गदर्शनाखाली “गौ सन्मान आवाहन अभियान” राबविण्यात येत असून, गोमातेला “राष्ट्रमाता” दर्जा मिळावा यासाठी ही व्यापक मोहीम सुरू आहे.

समाजामध्ये जनजागृती करून, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी

आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येणे ही काळाची गरज आहे.

🚩 जय श्रीराम

🚩 जय गोमाता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार