Home / Uncategorized / विश्वशांती बुद्ध विहारा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनी अभिवादन…

विश्वशांती बुद्ध विहारा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनी अभिवादन…

चिंचपूर प्रतिनिधी :विलास गवारगुर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी दिनांक 03/04/2026 शुक्रवार ला विश्वशांती बुद्ध विहारामध्ये अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी बौद्ध पंच मंडळ रमाबाई महिला मंडळ अष्टशील बालिका संघ भीम किरण नवयुवक आखाडा मंडळ व सहान बालक बालिका बहु संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बबन गवार गुर शेषराव गवारगुर सौ. वैशाली नागेश गवारगुर शांताबाई लक्ष्मण गवारगुर यांनी दीपा ने धुपा ने पुष्पा ने राजांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच नागेश गवारगुर ( सर) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्या मधील काही ठळक घडामोडींना आपल्या मनोगतामधून उजाळा दिला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विलास गवारगुर गायिका प्रेरणा जाधव निधी गवारगुर यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या राजांना अभिवादन केले या कार्यक्रमासाठी भीम किरण नवयुवक आखाडा मंडळाचे अध्यक्ष दयावंत गवारगूर व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार