Home / Uncategorized / सिल्लोडमध्ये महावितरणचा दिमाखदार गुणगौरव सोहळा; सावळदबारा शाखेची वसुलीत ऐतिहासिक आघाडी…

सिल्लोडमध्ये महावितरणचा दिमाखदार गुणगौरव सोहळा; सावळदबारा शाखेची वसुलीत ऐतिहासिक आघाडी…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान; अविनाश राऊत यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

सिल्लोड शहरात महावितरणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला २०२६ सालचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भव्य आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. दि. २ एप्रिल २०२६ रोजी शहरातील हॉटेल साई पॅलेस येथे हा सोहळा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिल्लोड विभागातील विविध शाखांमधील अधिकारी, कर्मचारी, लाईनमन आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणच्या सिल्लोड विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. विशेष म्हणजे सावळदबारा महावितरण शाखेने वसुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. या शाखेने सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध कामकाज आणि ग्राहकांशी सकारात्मक संवादाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यामुळे सावळदबारा शाखेचा सन्मान करताना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात गौरव व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड शाखेचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत होते. आपल्या भाषणात त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “महावितरणची प्रगती ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रामाणिक कामावर अवलंबून आहे. ग्राहकांशी सुसंवाद, वेळेवर सेवा आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम केल्यास यश नक्की मिळते.” त्यांनी पुढे वसुली वाढविण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याचेही आवाहन केले.

यावेळी उपकार्यकारी अभियंता सपकाळ साहेब, एचआर मॅनेजर बागड यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्यपद्धतीत सुधारणा, शिस्तबद्ध कामकाज आणि तांत्रिक कौशल्य वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संघभावना आणि समन्वयातूनच मोठी उद्दिष्टे साध्य होतात, असे सांगत सर्वांना प्रेरित केले.

कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे, सहायक अभियंता अविनाश पाटील,मांडे साहेब, लटपटे साहेब, आऊते साहेब यांच्यासह सहाय्यक अभियंता अविनाश पाटील, सोमनाथ घुले, निम्नतर लिपिक सचिन आगलावे, टेक्निकल मंगेश धनोकार (भुसावळ) यांची उपस्थिती होती. तसेच लाईनमन ज्ञानेश्वर घोडके, वैभव ठाकूर, गणेश काकडे, भगतसिंग परदेशी, सुशील लांडगे, फाल्गुन मोरे , महिला दामिनी पथक आदी कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या गुणगौरव सोहळ्यात विविध शाखांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा उत्साह निर्माण झाला आहे.

संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. सावळदबारा शाखेच्या यशामुळे सिल्लोड विभागात महावितरणच्या कामगिरीला नवे बळ मिळाले असून इतर शाखांसाठीही हा आदर्श ठरला आहे.

मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या या भव्य गुणगौरव सोहळ्याने महावितरणच्या कार्यसंस्कृतीला नवी दिशा दिली असून आगामी काळात अधिक प्रभावी सेवा देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार