छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
कोळी बोडखा (ता. पैठण), दि. १ एप्रिल २०२६ :
पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी माध्यम शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने स्थापना करण्यात आली. या समितीच्या गठनासाठी आयोजित पालक सभेत गावकरी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. केंद्रप्रमुख श्री. बळीराम भुमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पारदर्शक वातावरणात संपन्न झाली.
यावेळी मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक तुकाराम ढोले यांनी शासनाच्या जीआरनुसार समितीची रचना, कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ढवळे सर, आंधळे सर, गहिरवार मॅडम, गंगथडे मॅडम, जगताप मॅडम तसेच उर्दू माध्यमचे मुख्याध्यापक इब्राहिम पटेल, तनवीर मॅडम, सुमेरा मॅडम व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
मागील समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्या समितीची निवड घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रदीप रमेश पोटफोडे व उपाध्यक्षपदी गणेश मारोती ठोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून अनिस बुढान शेख, शिवकन्या प्रभाकर हातागळे, दिनेश कल्याण मगरे, दिपाली रामभाऊ वैद्य, शबाना दस्तगीर शेख, योगेश साईनाथ गायकवाड, ज्योती संतोष पांढरे, ग्रामपंचायत सदस्य हाशम समद शेख, शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती सविता जगताप तसेच शिक्षणप्रेमी विठोबा ठोके यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नव्या समितीकडून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






