Home / Uncategorized / वैजापूरात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन उत्सव निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात…

वैजापूरात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन उत्सव निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात…

छत्रपती संभाजीनगर : गोकुळ सिंग राजपूत

वैजापूर ता,३१

“भगवान महावीरजी की जय”,”अहिंसो परम धर्म की जय”,भगवान महावीर भगवान की जय” “एक दो तीन चार-भगवान महावीर जी की जय”अशा घोषणा देत मंगळवार(ता,३१)रोजी सकाळी  आठ वाजता महात्मा

गांधी मैदानावर महिला व पुरुष आपल्या दुचाकी सह मोठ्या संख्येने जमले  “भगवान महावीर फेरीला” मर्चंट बँक चेअरमन बाळासाहेब संचेती प्रकाश शेठ बोथरा, संतोष बोथरा, सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक धोंडिरामसिंह राजपूत,अशोक पवार खंडाळकर,बाबूलालजी संचेती,प्रफुल संचेती, उमेश संचेती,सुरेंद्र संचेती, राजू संचेती,निलेश पारख, सुभाष बोरा,  यांनी ध्वज दाखविला

या फेरीत महिला वर्ग राखी बोहरा,नीता लोहाडे,अर्चना लोहाडे,गीतांजली लोहाडे,वनिता कासलीवाल,शीला शेट्टी व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.या नंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभा पद यात्रा फेरी प.पू.श्री.तारक ऋषीजी,व प.पू.श्री तिर्थतीलक महाराज यांच्या उपस्थितीत  मंगल वाद्यच्या स्वरात शहराच्या सर्व मुख्य रस्त्यावरून ही काढण्यात येऊन भगवान महावीरजींचा अहिंसो परमोधर्म  संदेश शहरात घराघरात पोहचविण्यात आला.या शोभा यात्रा फेरीत सकल जैन समुदायाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या फेरीचा समापन समारंभ  जैन स्थानक येथे ऋषीजी यांच्या अमृत वचनांनी झाला.या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम ही सम्पन्न झाले.राजू संचेती,विजय कासलीवाल,निलेश पारख,सुनंदीलाल बोथरा, पारख यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार