प्रतिनिधी) दि.23मार्च.
श्री.जगदंबा बल्लाळ देवी संस्थान अमडापुर तर्फे वासंतीक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) दि.१९ मार्च गुरुवारला सायं.७ वा. घटस्थापना करण्यात आली. दि.२६ मार्च शुक्रवार पर्यंत विविध धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा बल्लाळ देवीच्या रूपात अमडापूर नगरी स्थित आहे. परिसरातील भाविक भक्तांची अपार श्रद्धा असलेले तीर्थक्षेत्र पांडवकालीन असून, त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे तसेच नवरात्रामध्ये संस्थांवर मोठा उत्सव साजरा करण्यात येतो व मोठी यात्रा भर असते आणि मोठ्या भक्ती भावाने हजारो भक्त नवरात्रात सहभागी होतात. वर्षभर मराठवाड्यातून व विदर्भातून श्री.गजानन महाराज शेगाव येथे जाणाऱ्या शेकडो दिंड्या व वारकरी या संस्थांवर मुक्कामी येतात त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था संस्थान करीत असते. येथे रोज सकाळ संध्याकाळ आरती व नामजप कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. चैत्र सोहळ्यात काकडा भजन, दुर्गा सप्तशती पाठ, हरिपाठ व रात्री सात ते बारा अमडापूर, ऐनखेड, उदयनगर, इसोली, धानोरी, पिंपरखेड, मुंदेफळ, जानेफळ, बोरगाव काकडे, थार, सारशीव, कळमेश्वर, गोंढाळा, कंबरखेड, पेनसावंगी, उसरण, पिंपळगाव उंडा, महिमळ, कारखेड, नायगाव दत्तापूर, पिंपरी माळी, शेणला, साखरखेर्डा , मंगरूळ, नवघरे,सवना, मालगणी, वडाळी, चिंचपूर, मोरखेड, पाळा, राजेगाव, गजरखेड, पेठ, हिवरा बू,चिखली, सावरखेड, दहिगाव, भालेगाव, एकलारा,करतवाडी, पांढरदेव, गोमेधर, वरखेड, दोन हिवरा आश्रम, मोहखेड, सावरखेड खुर्द, डासाळा, करवंड पेनटाकळी, डोंगरगाव, धोत्रा नाईक, मालगणी, तोरणवाडा, उटी, सूळा, अमडापुर परिसरातील महिला भजनी मंडळी भजन करतात. दि.२६ मार्च गुरुवार रोजी दु.१२ वा. पासून दु.४ वाजेपर्यंत राम जन्मोत्सव तसेच श्रीराम व जगदंबा बल्लाळ देवीची भव्य गावातून मिरवणूक दि.२७ मार्च शुक्रवार रोजी सकाळी नऊ वा. ह.भ.प बाबुरावजी सवडतकर गुरुजी मुहखेड यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन व महाप्रसादने सांगता होणार आहे.






