छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सभापती उत्तम चव्हाण यांचे आवाहन – घरकुल व इतर योजनांच्या तक्रारींसाठी नागरिकांनी सकाळी ६ वाजता ग्रामपंचायतीत उपस्थित रहावे
सोयगाव पंचायत समिती अंतर्गत सावळदबारा व फरदापूर गटातील लाभार्थ्यांच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यासाठी दि. 20 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायतनिहाय विशेष भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती उत्तम महारु चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) शिरीष बडग, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक विजय काटकर, आदित्य दुबे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सागर मोरे, तसेच प्रबुद्ध पानपाटील व अविनाश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी गावोगावी भेट देऊन लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
भेटींचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
पळसखेडा – सकाळी 08.00
वरखेडी बुद्रुक – 10.00
जामठी – 11.30
रवळा/जवळा – 01.00
घानेगाव – 02.30
सावळदबारा – 04.00
टिटवी – 05.00
या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दि. 20 मार्च रोजी सकाळी 07.00 वाजता पंचायत समिती, सोयगाव येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी (वर्ग १) यांनी दिली.
दरम्यान, भाजपचे सरचिटणीस मनोज बुढाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांचे घरकुल, गायगोटा किंवा इतर शासकीय योजनांबाबत फोटो, कागदपत्रे अथवा काही अडचणी असतील त्यांनी सकाळी 06.00 वाजता आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून समस्या मांडाव्यात. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे गावपातळीवरच समस्या सोडविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे माहिती भाजपाचे सरचिटणीस मनोज शिवाजीराव बुढाळ यांनी बोलताना सांगितले आहे.






