Home / Uncategorized / जरंडी मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज शिव समाधान शिबिर’ यशस्वी; नागरिकांच्या विविध प्रश्नांना तत्काळ दिला दिलासा….

जरंडी मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज शिव समाधान शिबिर’ यशस्वी; नागरिकांच्या विविध प्रश्नांना तत्काळ दिला दिलासा….

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून सोयगाव महसूल विभागाच्या वतीने मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज शिव समाधान शिबिर” अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळात शिव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री संभाजी अडकूणे साहेब (अप्पर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर) यांनी मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार मा. श्रीमती मनीषा मेने मॅडम,मा. श्री शिवाजी येंबुलवार साहेब (गट विकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव), कृषी अधिकारी भारत कासार साहेब (कृषी अधिकारी सोयगाव), श्रीमती एस. पी. सैवर मॅडम (बाल विकास प्रकल्प अधिकारी सोयगाव), मा. श्री काकासाहेब सावळे (नायब तहसीलदार सोयगाव), मा. श्री राहुल पत्रिके साहेब (नायब तहसीलदार सोयगाव) तसेच मा. श्री बहुरी साहेब (नायब तहसीलदार सोयगाव) यांची उपस्थिती लाभली.

यावेळी लोकप्रतिनिधींमध्ये मा. श्रीमती पुष्पाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य), मा. श्रीमती संगीता ताई गावंडे (पंचायत समिती सदस्य), मा. श्रीमती स्वातीताई पाटील (माजी सरपंच, जरंडी) तसेच मा. श्री सुनील भाऊ गावंडे (भाजपा जिल्हा सचिव, छत्रपती संभाजीनगर) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या शिव समाधान शिबिरामध्ये महसूल, पंचायत, कृषी, महिला व बाल विकास तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या अनेक शासकीय कामांचा तात्काळ निपटारा करून त्यांना दिलासा देण्यात आला. जमिनीशी संबंधित कागदपत्रे, विविध दाखले, शासकीय योजनांची माहिती तसेच इतर प्रशासकीय अडचणी यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवरच मार्गदर्शन केले.

जरंडी मंडळाचे मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून जरंडी मंडळातील अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शासनाच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना प्रशासन त्यांच्या दारातच उपलब्ध झाल्याची भावना निर्माण झाली असून अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.अशी माहिती नायब तहसीलदार काकासाहेब सावळे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार