Home / Uncategorized / ओमराजे गायकवाड यांच्या पुढाकारातून पळसखेड दौलत येथे ज्ञान आणि आरोग्याचा दुहेरी उपक्रम

ओमराजे गायकवाड यांच्या पुढाकारातून पळसखेड दौलत येथे ज्ञान आणि आरोग्याचा दुहेरी उपक्रम

बुलडाणा.

पळसखेड दौलत (दि. १९ फेब्रुवारी २०२६) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना विद्यार्थीसेना तालुका प्रमुख तथा गोरक्षक ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्या पुढाकारातून पळसखेड दौलत येथे वक्तृत्व स्पर्धा व भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मा. जिल्हा परिषद शाळा व भास्करराव शिंगणे विद्यालय, पळसखेड दौलत येथील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी गीत, भाषण व पोवाड्यांद्वारे शिवचरित्र प्रभावीपणे सादर केले. विद्यार्थ्यांच्या धाडसी आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुंदर प्रतिमा प्रदान करण्यात आल्या. बक्षीस वितरण मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते तसेच आयोजक ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद शिक्षक पाटील सर व मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच भास्करराव शिंगणे विद्यालयाचे गायकवाड सर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. वक्तृत्व स्पर्धेनंतर लगेच ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्या पुढाकारातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, सिकल सेल तपासणी, डोळ्यांची तपासणी, सामान्य आजार तपासणी तसेच महिला व बालकांसाठी विशेष तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात डॉ. विनोद वायाळ, डॉ. पल्लवी राजपूत (वैद्यकीय अधिकारी), डॉ. सुमित जेऊघाले, खेडेकर (समुदाय आरोग्य अधिकारी), नीता सोलंकी (एएनएम), गणेश सोळंकी, प्रभाकर ठेंग (एमपीडब्ल्यू) व इतर आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

संपूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेला हा दुहेरी उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार