मानोरा प्रतिनिधी : सुधीर ढगे
कोणत्याही कार्यकर्त्याचे मन न दुखवता,
सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालणाऱ्या,
जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाचा ध्यास घेणाऱ्या, शांत मनमिळवू, अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व,समाजहिताची जाणीव, विकासाची दूरदृष्टी आणि संवेदनशील नेतृत्व,कर्तृत्ववान लोकनेत्या कारंजा मानोरा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मा. आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा जेष्ठ नेते महादेवराव ठाकरे, भाजपा तालुका सरचिटणीस प्रवीण धोटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदकिशोर ठाकरे, माजी सरपंच गणेश ठाकरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मित्तल धोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन इंगोले मॅडम व शिक्षिका सिमा गायकवाड मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.






