चिखली | उमा जैवाळ
विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित काळोना गावासाठी बेमुदत आमरण उपोषण; प्रशासनाची दखल, पहिल्याच दिवशी उपोषणाची सांगता….
एकीकडे देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग, मेट्रोसारखे प्रकल्प साकार होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. त्यातलेच एक उदाहरण म्हणजे चिखली तालुक्यातील काळोना गाव.
काळोना गाव अजूनही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असून धक्कादायक बाब म्हणजे गावाचे नाव अद्याप महसूल नकाशावरही अस्तित्वात नाही. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
याच पार्श्वभूमीवर दिनांक ०९/०२/२०२६ रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे यांच्यासह इतर सहकारी तसेच काळोना गावातील महिला-पुरुष ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :
काळोना गाव महसूल पटलावर समाविष्ट करणे
काळोना गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था तात्काळ दुरुस्त करणे
काळोना गावातील स्मशानभूमीची समस्या त्वरित मार्गी लावणे
खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी काळोना गावाला मिळावे
या उपोषणाची दखल घेत प्रशासनातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत सर्व मागण्या सकारात्मकरीत्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांच्या सासऱ्यांनी रस्ता व स्मशानभूमीच्या कामासाठी निधी देण्याचे जाहीर कबूल केले. तसेच जिल्ह्याचे भूमिपुत्र, खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी दूरध्वनीद्वारे गावाच्या समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले.
प्रशासनाला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे असल्याने तसेच सर्व मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी-तोंडी आश्वासन मिळाल्याने पहिल्याच दिवशी लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपस्थित अधिकारी व मान्यवर :
या वेळी चिखली तहसीलचे नायब तहसीलदार गायकवाड साहेब, अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शक्करगे साहेब व कर्मचारी वर्ग, पाटबंधारे विभागाचे पांडे साहेब, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चेके साहेब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तसेच पंचक्रोशीतील पंजाबराव जावळे, विष्णू पाटील घुबे, प्रा. उद्धव घुबे, सतीश पाटील भुतेकर, उषाताई थुट्टे पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उद्धव पाटील थुट्टे, भिकन पाटील भुतेकर, ऋषी भोपळे, प्रशांत जेवाळ उपस्थित होते.
उपोषणात सहभागी ग्रामस्थ :
संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे, गणेश उसर, गजानन उसर, समाधान उसर, मधुकर उसर, समाधान गाडेकर, सावन सिंग उसर, सिद्धेश्वर उसर, विठ्ठल उसर, विलास उसर, तुकाराम उसर, ज्ञानेश्वर उसर, सुखदेव गाडेकर, शिवाजी गाडेकर, रंगनाथ शिंदे, भास्कर शिंदे, शिवाजी उसर, रमेश उसर, नारायण सर, विजय उसर यांच्यासह असंख्य महिला उपोषणास बसल्या होत्या.






