Home / Uncategorized / भाग 2:- गोद्रीवाडी शाळेतील मस्तावलेल्या ‘मास्तर’ विरोधात ऑल इंडिया पैंथर सेना आक्रमक; कारवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा.!

भाग 2:- गोद्रीवाडी शाळेतील मस्तावलेल्या ‘मास्तर’ विरोधात ऑल इंडिया पैंथर सेना आक्रमक; कारवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा.!

बुलडाणा: प्रशांत जैवाळ 

चिखली तालुक्यातील गोदरी वाडी येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये चाललेल्या गलथान कारभारा विरुद्ध आता पैंथर सेना मैदानात उतरली आहे.या घटने बाबत पँथर सेने च्या वतीने गटशिक्षणाधिकारी चिखली यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात मम्हटले आहे की, दिनांक ०५/०२/२०२६ व ०६/०२/२०२६ रोजीच्या शिक्षणाधिकारी जि.प. बुलडाणा यांच्या आदेशान्वये बुलडाणा जिल्यामध्ये जि.प. कर्मचारी यांच्या क्रिडा स्पर्धा असल्यामुळे जि.प. शाळांची वेळ ही वरील दोन दिवसांसाठी सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत राहील, असा आदेश पारीत झालेला होता.असे असतांना दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सुचने प्रमाणे गोदरी येथील जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थी सकाळी ७.०० वाजेदरम्यान शाळेत हजर राहीले. परंतू तिथे सर्व शाळेच्या वर्ग खोल्यांना कुलूप लावलेले असल्यामुळे विद्यार्थी भ्रमीत होऊन, शाळा का बंद आहे म्हणून विद्यार्थीनी चौकशी केली, त्याच चौकशी परीपाक म्हणून आम्ही ऑल इंडिया पँथर सेनचे चिखली तालुक्यातील पदाधिकारी व पत्रकार बांधव त्याठिकाणी गोदरी येथे गेलो असता सदरहू घटनेबाबत आम्ही गोदरी चे केंद्रप्रमुख यांना त्याठिकाणी बोलावून घेऊन त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक यांना फोनवर आणि प्रत्यक्षात बोललो असता ते आमच्या सोबत उध्दटपणे / मुजोरपणे बोलायला लागले व तसेच शिक्षक जोगदंडे व मॅडम हे त्या ठिकाणी हजर नव्हते. त्या शाळेचे प्राचार्य हे बाहेरगावी असल्याचे कळाले, नंतर मॅडम यांनी जवळपास १०.०० वाजता शाळा उघडुन चिखली शहरातून काही विद्यार्थी घेऊन शाळा सुरु केली, व असे सांगीतले की आमची शाळा दुपारीच असते. परंतू जिल्यातील सर्व शाळा आदेशान्वये सकाळची असतांना सदरहू शाळेच्या मॅडम शाळा दुपारीच असते, असे कसे म्हणू शकते ?नंतर दिनांक ०६/०२/२०२६ रोजी पदाधिकारी व पत्रकार परत दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान लोक महाराष्ट्र न्युज चे मुख्य संपादक / पत्रकार यांच्यासह शाळेत गेलो असता ती शाळा त्यावेळी बंद होती. परत केंद्रप्रमुखा सोबत फोनवर बोललो असता मी अमरावतीला आहे मी आल्यानंतर तुम्हाला बोलतो, त्यानंतर काही वेळात शाळेचे मुख्याध्यापक श्री जोगदंडे त्याठिकाणी आले व उलट अरेरावीच्या भाषेत बोलायला सुरुवात केली की, तुम्ही शाळेत कसे काय आले, मी तुमच्यावर कारवाई करेल. यामध्ये केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक या दोघांनी संगनमत करून सदरहू घडलेल्या प्रकारामध्ये चुक झाकण्यासाठी खोटे नाटे बोलुन त्याठिकाणी चुकीची माहिती देऊ त्याठिकाणा वरून बाहेर काढून दिले.सदरहू झालेला प्रकार हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असून जि.प. शाळा अगोदरच डबघाईस असतांना, शिक्षकांनी सदरहू शाळा त्यांच्या मनमर्जीपणाने चालवून, वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे.सदरहू प्रकाराबाबत शिक्षण विभागाने तातडीने यातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबीत करावे, असे न झाल्यास आम्हाला ऑल इंडीया पँथर सेनेच्या वतीने आंदोलन करेल मग होणाऱ्या परीणामास सबंधित प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार