Home / Uncategorized / अजितदादांच्या स्मृतींना पहूर येथे अभिवादन

अजितदादांच्या स्मृतींना पहूर येथे अभिवादन

 

 

पहूर बंद मध्ये सहभागी झाले शोकाकुल पहुरकर

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यू मुळे सारा महाराष्ट्र हळहळतो आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आज पहुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वपक्षींतर्फे शोकसभेचे आयोजन करून पहूर बंदची हाक देण्यात आली यात सर्व दुकाने प्रतिष्ठाने स्वतःहून नागरिकांनी बंद ठेवून आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रमिला पाटील, प्रदीप लोढा, भास्कर पाटील , शामराव गावंडे , राजू पाटील , शरद पांढरे , रवी मोरे , किरण पाटील , शैलेश पाटील , राजेंद्र चौधरी , ज्ञानेश्वर करवंदे , बंडू पाटील , बबलू कोटेचा , विनोद पाटील, ईश्वर बारी, ईश्वर बनकर , सलीम मौलाना यांच्यासह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार