Home / Uncategorized / श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय मध्ये प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा

श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय मध्ये प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा

चिखली | मेघा जाधव 

आज दिनांक 26 जानेवारी 2026 ला श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय पेठ तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम ध्वजारोहण ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे सचिव मा ज्ञानदेव भाऊ शेळके यांच्या हस्ते तसेच संचालक मा सागरजी शेळके सर प्राचार्य नंदकिशोर वाघ सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्यानंतर सामूहिक संविधान वाचन तसेच साक्षरतेची शपथ घेण्यात आली तदनंतर देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायतीचे आयोजन करण्यात आले नंतर ढोल ताशा व लेझीम पथकाच्या गजरात रॅलीचे आयोजन करण्यात आले . त्यामध्ये ढोल ताशा पथकांनी आपले प्रात्यक्षिक गावामध्ये सादर केले . त्यामध्येच लेझीम पथकाचे विविध प्रात्यक्षिके सादर केली . नंतर शाळेच्या प्रांगणामध्ये स्वागत गीत विविध देशभक्तीपर गीतावरील नृत्य सादर करण्यात आले नंतर रजत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजत फाउंडेशन पुणे यासंस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ घुबे संचालक सुनील भाऊ घुबे, सौ श्रद्धा घुगे ,सौ सविता घुबे. युवराज भुसारी. प्राध्यापक गणेश मोरे सर यांच्याकडून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना जॅकेट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी कार्यकमाचे भारदार संचालन प्रा सुभाष शेळके सर तर प्रास्ताविक प्रा अनंत काकडे यांनी केले . कार्यकमाचे अध्यक्ष रजत फाउंडेशनचे अध्यक्ष मा सुनील भाऊ घुबे यांनी समाजाप्रती रजत फाउंडेशनचा उद्देश आपल्या भाषणातून व्यक्त केला तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच पुण्यातील विविध अभ्यासक्रमासाठी आणि विदेशात जाण्याकरिता इंग्लिश स्पिकिंग कोर्स साठी ची व्यवस्था रजत फाउंडेशन पुणे करून देण्याची हमी विद्यार्थ्यांना दिली व कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले त्याप्रसंगीच ए आय इंजिनियर माननीय चिराग घुबे यांनी विद्यार्थ्यांना विविध देश-विदेशातील कोर्स व त्याचा आपल्या जीवनातील उपयोग विद्यार्थ्यांना समजून सांगितला व विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली व त्यासाठी कोणती मदत लागल्यास रजत फाउंडेशन पुणे आपल्यासाठी सदैव तयार आहे अशी हमी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिली व पुण्यामध्ये शिक्षणाकरिता कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव आपल्यासाठी तयार आहोत आपण यावे असे आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले नंतर ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे संचालक माननीय सागर जी शेळके सर यांनी ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठ च्या स्थापने पासून समाजाच्या गोरगरीबाल्या प्रति संख्येचे कार्य विशद केले व रजन फाउंडेशनचे आभार मानले . आभार प्रदर्शन प्राचार्य वाघ सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले व सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार