छ. संभाजीनगर प्रतिनिधी : श्रीपत पवार
नातेवाइकांचे अश्रू अनावर तीच्या आईने सांगितले की गेल्या दहा दिवसांपासून आम्ही तीला शोधतोय
फुलंब्री येथे होती हरवल्याची तक्रार दाखल सदर महिला सापडली होती जवाहर नगर पोस्ट हद्दीमध्ये ती दगडे मारत असल्याचे समोर आले होतो पोलीसांच्या मदतीने तीला शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी मनोरुग्ण असल्याचे सांगितल्यानंतर महिलेला तात्पुरत्या निवार्या करीता पोलिसांनी माणुसकी वृद्ध सेवालय येथे दाखल केले असता माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालीका पुजा पंडित यांनी महिलेची विचारपूस करत असतांनाच तीला विश्वासात घेऊन नाव गाव पत्ता विचारले असता तीने फक्त गावाचे नाव सावंगी असल्याचे सांगितल्यानंतर पोस्टे फुलंब्री येथे माननीय पोलीस निरीक्षक साह्याने साहेब यांच्याशी फोन द्वारे चौकशी करून सदर महिलेची मिसिंग दाखल असल्याचे साहेबांनी सांगितले.बीट जमादार राठोड यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी तीच्या नातेवाईकांना माणुसकी वृध्द सेवालय येथे पाठवले तीची ओळख पटल्यानंतर तीच्या आईने सांगितले की गेल्या दहा दिवसांपासून आम्ही तीला शोधतोय ती घरातुन न सांगताच नीघुन गेली होती तीचे वडील मयत झाल्यापासून तीला मोठा धक्का बसला आहे.आईला पाहताच तीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले,माणुसकी वृध्द सेवालयाच्या पुजा पंडित यांनी तात्काळ नातेवाईकांचा शोध घेऊन आज रोजी पोस्टे जवाहर नगर येथे सदर महिलेची माहिती देवून कागदपत्रे पुर्तता करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.संजय साहाने पोलीस निरीक्षक फुलंब्री,मारुती खील्लारे साहेब पो.उप निरीक्षक जवाहरनगर,बीट जमादार कैलास राठोड, पो.ह.हरिश्चंद्र नरके, माणुसकी समुहाचे सुमित पंडित आदिनी मदतकार्य केले






