व्यसनापासून दूर राहा अन् इतरांनाही त्यापासून परावृत्त करा : मा.न्यायाधीश आय.ए. वाय. ए .खान साहेब चिखली न्यायालय
चिखली : लोक महाराष्ट्र न्यूज )व्यसन ही केवळ व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. युवक वर्ग हा देशाचा कणा आहे, आणि जर या कण्याला व्यसनाचे ओझे बसले तर राष्ट्राच्या विकासालाच धोका निर्माण होतो. स्वतः व्यसनापासून दूर राहा आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करा. एक जागरूक विद्यार्थी समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश क. स्तर, चिखली माननीय आय. ए. वाय. ए. खान यांनी केले.
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार तसेच मा.म.रा.वि.से.प्रा. मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली “आमली पदार्थांचे सेवन व मद्याचे व्यसन : दुष्परिणाम आणि पुनर्वसन तसेच संबंधित कायदे” या विषयावर जनजागृतीपर शिबिराचे आयोजन तालुका विधी सेवा समिती, चिखली तथा विधीज्ञ संघ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, चिखली येथे मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. वृषालीताई बोंद्रे, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पी. यू. इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य ए .एन. नन्हई, तालुका वकील संघाचे अध्यक्ष एस. आर. सोनाळकर, ज्येष्ठ विधीज्ञ विजयकुमार कस्तुरे, अँड जयश्री कुटे,, अँड जुबेर,, अँड. चव्हाण,, अँड.दिलीप यंगड सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पी. यू. इंगळे यांनी आमली पदार्थ व मद्य व्यसनाचे दुष्परिणाम, पुनर्वसनाच्या उपाययोजना यावर आणि या संबंधित कायदे सविस्तर पणे न्यायाधीश खान साहेब यांनी विषद केले.. तसेच ज्येष्ठ वकील ॲड कस्तुरे साहेब यांनी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या जनजागृती शिबिरास सुमारे 150 विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकवृंद आणि महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. शिबिराचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन विधीज्ञ विलास एन. नन्हई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी तथा अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले






