Home / महाराष्ट्र / बुलढाणा / “सौ. विद्याताई सुनिल धंदर पाटील – सवना जिल्हा परिषदेसाठी सज्ज!

“सौ. विद्याताई सुनिल धंदर पाटील – सवना जिल्हा परिषदेसाठी सज्ज!

 

*सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर जनतेत वाढते समर्थन*

चिखली प्रतिनिधी

सवना जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नाव सर्वत्र चर्चेत आहे सौ. विद्याताई सुनिल धंदर पाटील. भगत कुटुंबाची लेकबाळ आणि धंदर कुटुंबाची सून म्हणून ओळख असलेल्या विद्याताईंनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि जनसंपर्कातून जनतेच्या मनात आपली वेगळी छाप पाडली आहे.

 

त्यांचे वडील हे शासकीय ग्रेडर म्हणून सेवेत होते, तर पती सुनिल धंदर पाटील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले शिक्षक असून सध्या पळसखेड जयती येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 

सुनील पाटील हे केवळ शिक्षकच नव्हे तर समाजसेवक म्हणूनही ओळखले जातात. विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून ग्रामविकास, शिक्षण आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

 

सौ. विद्याताई यांच्या उमेदवारीची चर्चा सवना परिसरात मोठ्या उत्साहाने होत असून त्यांना महिला, शिक्षकवर्ग तसेच तरुण मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवर त्यांची स्वच्छ प्रतिमा, लोकांशी जिव्हाळ्याचं नातं आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या उमेदवारीची खरी ताकद ठरत आहे.जनतेचा विश्वास आणि सेवाभाव हीच माझी खरी संपत्ती आहे असे विद्याताई म्हणतात.

 

सवना जिल्हा परिषद सर्कलमध्ये आता निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून सौ. विद्याताई सुनिल धंदर पाटील यांचा हा राजकीय प्रवास उत्साही आणि आशादायी ठरणार आहे, अशी चर्चा ग्रामपातळीवर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार