Home / Uncategorized / लिंबगाव फाट्यावर मंगळवारी अपघात तीन जण गंभीर जखमी….

लिंबगाव फाट्यावर मंगळवारी अपघात तीन जण गंभीर जखमी….

  (छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार )

पैठण पाचोड राज्य महामार्ग वरील लिंबगाव फाटा येथे मंगळवारी (ता६. ))दुपारी दोन वाजे च्या सुमारास ॲपे रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत पैठण तालुक्यातील मौजे लिंबगाव येथील रहिवासी मच्छिंद्र त्रिंबक कोलते 65 ) हे आपल्या ॲपे रिक्षाने(क्रमांक एम एच १५जे७१३७) पाचोड कडून लिंबगावच्या दिशेने जात होते त्यांची रिक्षा लिंबगाव फाटा येथे वळण घेत असताना पैठण कडून पाचोडकडे येणाऱ्या भरघाव दुचाकीने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने या अपघातात रिक्षा चालक मच्छिंद्र त्रिंबक कोलते ६५, कल्याण गंगाधर घायाळ ५५ राहणार पाचोड यांच्यासह दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाले आहे या घटनेची नोंद पोलीस स्टेशन पाचोड येथे करण्यात आलेली आहे. लिंबगाव ग्रामस्थांची गतिरोधक बसवण्याची मागणी. लिंबगाव फाटा येथे मागील सहा महिन्यात तीन वेळा अपघात घडले असून या ठिकाणी खूप वर्दळ असते येणारे जाणारे वाहन ही खूप वेगाने असतात विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो त्यामुळे लिंबगाव फाटा येथे गतिरोधक बसवावे गतिरोधक बस वल्यास अपघात कमी होईल त्यामुळे याकडे महामार्ग प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार