Home / Uncategorized / अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख यांना निवेदन…

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख यांना निवेदन…

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सावळदबारा जि.प.के.प्रा.शाळा केंद्रप्रमुख यांना समितीतर्फे निवेदन..

सावळदबारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळदबारा केंद्र व उपकेंद्र टिटवी येथील मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहतात किंवा नाहीत, याची सखोल चौकशी करण्यात यावी‌ करून नियमभंग आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

उपकेंद्र टिटवी येथील मुख्याध्यापक व शिक्षकांची पदस्थापना, कार्यरत पद, मुख्यालय तसेच मुख्यालयी वास्तव्याबाबत सादर केलेली घोषणापत्रे व प्रमाणपत्रांची तपासणी व तसा शासन निर्णय दाखवण्यात यावा . तसेच मुख्यालयाबाहेर राहण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आहे का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.बरेच प्राथमिक शाळेचे शिक्षक बुलढाणा जिल्ह्यात व शहरात राहतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे व सर्व कागदपत्रे समिती ला दाखवण्यात यावी

गरज भासल्यास अचानक प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी व शासन नियमांनुसार दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे तालुकाध्यक्ष विजय काळे, उपतालुकाप्रमुख सुनील चोरमले, विभागीय सेक्रेटरी गोकुळसिंग राजपूत व कार्याध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार