Home / Uncategorized / सोयगांव तालुक्यात तूर पिकावर घोसला येथे शेतीशाळा उपक्रमातून मार्गदर्शन…

सोयगांव तालुक्यात तूर पिकावर घोसला येथे शेतीशाळा उपक्रमातून मार्गदर्शन…

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगांव तालुक्यात कृषि विभागाच्या आत्मा योजनेतून खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये तूर पिकावर प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर धनश्री जाधव व प्रकल्प उपसंचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर डॉ. अभयकुमार पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने घोसला येथे तूर पिकाच्या लगावडीपासून ते काढणीपर्यंत सहा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

घोसला येथे २१ मे २०२६ ते ३० डिसेंबर २०२६ या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल महाजन सहाय्यक कृषि अधिकारी वैष्णवी भगत यांचे मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सदरील शेतीशाळा उपक्रमात प्रगतशील शेतकरी, रिसोर्स बँकेतील शेतकरी व कृषि महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व तूर पिकातील नवनवीन प्रयोग व अनुभव सांगण्यात येत आहे. सदरील शेतीशाळा राबविण्यासाठी नैसर्गिक शेती हि संकल्पना अवलंबून शेतकरी निवड, बिजप्रक्रिया, बियाणे व खते खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, गट निर्मिती, एकात्मिक किड व खत व्यवस्थापन, माती परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचे व्यवस्थापन, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, काढणी पश्च्यात तंत्रज्ञान व शेती पूरक व्यवसाय अश्या विविध अवस्थांची निश्चिती करण्यात आलेली आहे.

यापैकी आज रोजी जैविक निविष्ठा निर्मिती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने बिजामृत बनविणे, जिवामृत बनविणे, दशपर्णी अर्क बनविणे या विषयी माहिती व प्रात्यक्षिक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल महाजन यांचेमार्फत करून दाखविण्यात आले.

आजच्या शेतीशाळा वर्गात प्रगतीशील शेतकरी, तसेच महिला शेतकरी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार