लोक महाराष्ट्र न्यूज: उमा जैवाळ
समस्त बुलढाणेकरांना मिरवणुकीमध्ये सामील होण्याचे आव्हान सम्यक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर संस्थानाचे पुरोगामी राजे आणि महान समाजसुधारक . बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण, आरक्षण, शेती, उद्योग आणि अस्पृश्यता निर्मूलन या क्षेत्रांत अद्वितीय कार्य केलेले लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांची दिनांक 26 जून 2026 रोजी जयंती आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त सम्यक समन्वय समिती बुलढाणा च्या वतीने 26 जून रोजी मिरवणुकीचे आयोजन केले आहे. सकाळी नऊ वाजता महापुरुषांचे पुतळे जयस्तंभ चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल, तसेच एसबीआय चौक मार्गे मिरवणूक आयडीबीआय चौक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापाशी येईल आणि छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देऊन मिरवणुकीची सांगता होईल.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहता यावे, म्हणून त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार आदी विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली.
बहुजन उद्धारक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भव्य स्वरूपात साजरी व्हावी म्हणून सम्यक समन्वय समिती बुलढाणा च्या वतीने बुलढाणा शहरातील समस्त बहुजनवादी नागरिकांना मोठ्या संख्येने या मिरवणुकीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बुलढाणा शहरातील विविध पुरोगामी बहुजनवादी आणि समविचारी संस्था संघटना आणि व्यक्तींनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आश्वासन दिले आहे त्यापैकी महाबोधी महाविहार धम्मगिरी बुलढाणा, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा शहरातील सर्वच बुद्ध विहार समिती, मराठा सेवा संघ बुलढाणा, यश सिद्धी सैनिक सेवा संघ बुलढाणा, सम्राट आखाडा बुलढाणा, दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा, रमाईच्या लेकी बुलढाणा, ब्लू स्टार भीम कन्या ग्रुप बुलढाणा, रमाई ब्रिगेड बुलढाणा, आझाद हिंद शेतकरी संघटना बुलढाणा, लोकराजा शाहू फाउंडेशन बुलढाणा, उबंटू उलगुलान बुलढाणा, संवेदना प्रतिष्ठान बुलढाणा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाणा, राष्ट्रीय चर्मकार महासंघ बुलढाणा, बारा बलुतेदार महासंघ बुलढाणा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन स्मारक समिती, मातोश्री रमाई मंडळ सहयोग कॉलनी बुलढाणा. बुलढाणा शहरातील समविचारी संघटना आणि समस्त बौद्ध उपासक उपासिका संघ. उपरोक्त सर्व संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग या जयंती उत्सवानिमित्त असणार आहे.
सम्यक समन्वय समिती बुलढाणा च्या संपूर्ण सदस्यांच्या वतीने समस्त बुलढाणेकरांना या मिरवणुकीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.






