Home / Uncategorized / मानोरा येथे श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर समाज प्रबोधन कीर्तन संपन्न होणार..!

मानोरा येथे श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर समाज प्रबोधन कीर्तन संपन्न होणार..!

 

मानोरा प्रतिनिधी / सुधीर भाऊ ढगे

ज्ञान प्रसारक संस्कृत शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, मानोरा तसेच धम्मभूमी विकास कार्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी धम्मभूमी क्रीडा संकुल समोर, मानोरा येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

“जय भीम, जय ज्योती” या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन या विषयावर श्री सत्यपाल महाराज मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पूज्य भदंत डॉ. हर्षभोधी महाथेरो उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी वामनरावजी भगत राहतील. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय खासदार संजय भाऊ देशमुख, अनिल भाऊ राठोड, भक्तराज महाराज, दत्ताभाऊ डाहके, संजयजी रोठे यांच्यासह तालुक्यातील व गावातील भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाची माहिती आयोजक तुषार भाऊ भगत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार