छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०८
शासनाच्या निर्देशानुसार महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त नगर परिषद वैजापूर तर्फे बुधवार(ता.०८)रोजी महात्मा जोतिबा फुलें यांच्या पुतळ्याला अभिवादन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारतीय घटनेच्या उद्धेशिकेची प्रत उपस्थित नागरिकांना नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गर्शन खाली या उद्धेशिकेचे वाचन सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या सामाजिक समता सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे आवाहनही उपस्थिताना राजपूत यांनी केले.या प्रसंगी नगरसेवक,विशाल संचेती, दशरथ बनकर,उल्हास ठोंबरे, प्रशांत कंगले,राजेश गायकवाड,स्वप्निल जेजुरकर,पारस घाटे,हमीद कुरेशी, आमीरअली,राहुल त्रिभुवन,ज्योती जोशी, जयश्री राजपूत,दिपा राजपूत, बाबासाहेब पुतळे,गणेश खैरे, श्रावण चौधरी ,विनोद राजपूत, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी,डॉ, बी.बी.शिंदे,तसेच पत्रकार सुनील त्रिभुवन,विलास म्हस्के, दीपक बरकसे,विशाल त्रिभुवन, सामाजिक क्षेत्रातील बाबासाहेब गायकवाड, शंकर पहलवान,चांगदेव उघडे,बजरंग मगर,सुरेश राऊत, मधुकर पवार,किशोर साळुंकर,सुवर्णा बोर्डे, निर्मला जाधव,पालिकेचे
श्री साठे,श्री,मिरगु,जयपाल राजपूत,शंकर जोरे,संतोष
रत्नपारखी,राजू इंगळे, ज्ञानेश्वर सिरसाट,मंजिरी खैरे,सुनील भाग्यवंत,दिवाकर त्रिभुवन,बी.बी.जाधव,
श्री.गणवीर,कृष्ण त्रिभुवन, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन ,पालिका शाळांचे सर्व शिक्षक, पालिकेचे सर्व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले आभार भाग्यवंत यांनी मानले.
कॅप्शन प्रदान करतांना डॉ,दिनेश परदेशी,शिल्पा परदेशीश्री,साठे व नगरसेवक).






