हर्षवर्धन सपकाळ व राहुल बोन्द्रे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित?
मुंबई : रायपूर सर्कल, सैलानी, भडगाव व रायपूर परिसरातील अनेक स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेशितांचे पक्षात प्रवेश झाले.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा स्वीकार करत आज रायपूर, सैलानी, भडगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. रायपूर सर्कल सैलानी येथील शेख चांद मुजावर (माजी पंचायत समिती सदस्य), शेख असलम मुजावर (ग्रामपंचायत सदस्य), शेख इरफान मुजावर, शेख नई मुजावर, शेख रिजवान, शेख शहजाद मुजावर, शेख फिरोज मुजावर, शेख हुजेब मुजावर व शेख साहेब मुजावर (शेरू) यांनी पक्षप्रवेश केला. भडगाव येथील किशोर संतोषराव साखरे पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), प्रकाश शांतीराम खडके (ग्रामपंचायत सदस्य) तसेच रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान (माजी सरपंच), शेख भिकन शेख बबलू, सलीम खान हसन खान, शेख कयूम शेख बुडन व मोहम्मद मुशरथ मोहम्मद एजाज यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्यात व केंद्रात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत असून त्याचाच परिणाम म्हणून विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावरही पक्षाची ताकद वाढत असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःच्या बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमधील पक्षांतर रोखण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेशाचे प्रमाण वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
यावेळी भाजपा नेते शंकर पाटील तरमळे, पिंपळगावसराईचे सरपंच केशव पाटील तरमळे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील उगले, माजी सरपंच गणेश पाटील साखरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील शेवाळे आणि मंगेश तरमळे उपस्थित होते.






