Home / संस्कृती / VIDEO: ‘पुन्हा चूक होणार नाही’ रणजित कासलेने मागितली गुजरात पोलिसांची माफी, धक्कादायक कारनामा समोर!

VIDEO: ‘पुन्हा चूक होणार नाही’ रणजित कासलेने मागितली गुजरात पोलिसांची माफी, धक्कादायक कारनामा समोर!

Ranjit Kasle: 17 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र सायबर पोलीस  सेवेतून बडतर्फ झालेला रणजित कासले पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, फेक एनकाउंटरची अफवा, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर सुपारीची थिअरी, असे सलग बॉम्ब त्याने फोडले होते. गुजरात पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली होती. आता सुरत पोलिसांनी त्याचा एक व्हिडीओ समोर आणलाय. ज्यात त्याने केलेला धक्कादायक प्रकार आणि मागितलेली माफी यातून दिसत आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रातील बडतर्फ वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला सध्या सुरत पोलिसांच्या ताब्यात आहे. गुजरातमधील सूरतजवळील पाल परिसरात गुन्हे शाखेचा पीएसआय असल्याचा बनावट दावा करून एका महिलेला धाक दाखवला. त्याने जबरदस्तीने 2 लाख 26 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन हिसकावले. हा गुन्हा उघड झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी कासलेला लातूरमधून ताब्यात घेतले. सूरत शहर पोलिसांनी सोशल मीडियावर गुन्हा करतानाचा आणि महिलेकडून माफी मागतानाचा व्हिडिओ शेअर केला, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली. या व्हिडिओत कासले नम्रपणे पाप कबूल करताना दिसतो, ज्यामुळे त्याच्या वादग्रस्त इतिहासाला नवीन वळण मिळाले.

26 मार्चला सुरतच्या व्यापाऱ्याच्या फसवणुकीच्या तपासादरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय वाढला, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पीआयजी यांनी निलंबनाची कारवाई केली. पुण्यातून अटक होण्यापूर्वी कासलेने दिल्लीतून जामीन मिळवला होता, पण गुजरात प्रकरणाने त्याला पुन्हा जाळ्यात अडकवले.

काय म्हणाला कासले?

मी रणजित गंगाधर कासले. महाराष्ट्रात मी पोलीस सब इन्स्पेक्ट होतो. अखेरचा मी सायबर पोलिसांतून सस्पेंट झालो होतो. 14 तारखेला मी सुरुतला आलो होतो. मोबाईल, कॅश घेताना मला पोलिसांनी पकडले. पुन्हा माझ्याकडून ही चूक होणार नाही, असे कासलेने म्हटलंय. 

एनकाउंटर आणि ईव्हीएम आरोपांने उडवली खळबळ 

कासलेने सोशल मीडियावरील व्हिडिओत खळबळजनक दावे केले: ‘एन्काउंटरचा आदेश कोण देईल? हे बंद दाराआडच्या चर्चा आहेत. मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात १० लाख रुपये संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून (वाल्मीक कराडची) आले, ज्यातील ७.५ लाख परत केले, उरलेल्या २.५ लाखातून खर्च.’ हे पैसे ईव्हीएम छेडछाडीपासून दूर राहण्यासाठी होते, असे त्याने सांगितले. परळीत वाल्मीक कराडशी भेट झाल्याचा आणि बोगस एनकाउंटरसाठी (अक्षय शिंदेप्रमाणे) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेचा दावा केला. कासले स्वतःला अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक म्हटले, ज्याने राजकीय वर्तुळात भूकंप आणला.

ठाकरे गटाच्या नेत्य सुषमा अंधारे यांनी कासलेवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘व्यक्तीच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे तपासले पाहिजे.’ कासलेच्या अटकेनंतर धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि बीड पोलिसांवरील आरोपांची स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरली आहे. गुजरात पोलिसांनी कासलेला दोन दिवस कोठडीत ठेवण्याची मागणी कोर्टात केली, ज्यात सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे तपास होणार. कासलेने पुण्यात शरण जाण्याचा प्रयत्न केला, पण बीड पोलिसांनी स्वारगेट हॉटेलमधून ताब्यात घेतले.

सध्या सोशल मीडियावर #कासल्या चोर आणि #मिथुन गँगसारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत, ज्यात कासलेला मिथुन गँगशी जोडले जात आहे. गुजरात पोलिसांची कारवाई ही ‘कायद्याची जाणीव’ देणारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कासलेच्या आरोपांची सत्यता तपासली गेली नाही तर राजकीय षड्यंत्राच्या अफवांना उधाण येईल. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडेही पोहोचले असून, कासलेची चौकशी आणि न्यायालयीन निकाल हे पुढील टप्पे ठरतील, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण मिळू शकते, असे म्हटले जात आहे

FAQ

प्रश्न: रणजित कासले याला गुजरात पोलिसांनी का अटक केली?

उत्तर: बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने सूरतजवळील पाल परिसरात गुन्हे शाखेचा पीएसआय असल्याची बनावट ओळख सांगून एका महिलेकडून २,२६,००० रुपये आणि दोन मोबाईल फोन जबरदस्तीने लुटले. गुजरात पोलिसांनी त्याला लातूरमधून ताब्यात घेतले आणि गुन्हा करताना व माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे प्रकरण चर्चेत आले.

प्रश्न: रणजित कासले याच्यावर कोणते गंभीर आरोप आहेत?

उत्तर: कासलेने बीडमधील पोलिसांवर, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर फेक एनकाउंटर आणि सुपारीचे आरोप केले. त्याने दावा केला की, मतदानादिवशी त्याच्या खात्यात १० लाख रुपये आले, जे ईव्हीएम छेडछाडीपासून दूर राहण्यासाठी होते. तसेच, मागासवर्गीयांवर वादग्रस्त वक्तव्य (कुत्राही निवडून येतो) केल्याने त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

प्रश्न: या प्रकरणाला राजकीय नेत्यांचा काय प्रतिसाद आहे?

उत्तर: ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी कासलेच्या आरोपांवर भरोसा ठेवण्यास नकार दिला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांचे महत्त्व तपासण्याची गरज व्यक्त केली. कासलेच्या अटकेनंतर धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि बीड पोलिसांवरील आरोपांची स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे, पण त्याची सत्यता अद्याप तपासली गेलेली नाही.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार