Home / संस्कृती / सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध! ‘मुलींशी छेडछाड होते अन्…’

सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध! ‘मुलींशी छेडछाड होते अन्…’

Saras Baug Diwali Padwa Pahat 2025: पुण्यातील शनिवारवाडा येथे नमाज पठणावरुन वाद सुरु असतानाच आता दरवर्षी दिवाळीमध्ये सारसबाग येथे होणाऱ्या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमही वादात सापडला आहे. या कार्यक्रमाला काही हिंदू संघटनांनीच विरोध केला आहे. या कार्यक्रमाचा हिंदू संघटनांनी निषेध केला आहे. या कार्यक्रमाच्या नावाखाली मुलींशी छेडछाड केली जाते, असा आरोप विरोधक करणाऱ्यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे पोलिसांनी दिलेला शब्द अन् पुन्हा कार्यक्रम घेण्याची तयारी

सोशल मीडियावर या कार्यक्रमाला विरोध वाढत केला आणि त्याचा निषेध करण्यात आला. वाढता विरोध अन् निषेध लक्षात घेत आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुणे पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर हा पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे करणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भातील तयारी आज सकाळपासून पुन्हा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांनी आयोजकांना थेट इशारा दिला आहे. या कार्यक्रमामध्ये मुलींशी छेडछाड होते अन् धर्मविरोधी गाणी गायली जात असल्याचंही हिंदू संघटनांनी म्हणणं आहे.

आयोजकांनी नक्की काय म्हटलंय?

दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजक युवराज शाह यांनी हा कार्यक्रम शहराच्या संस्कृतीचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. “हा कार्यक्रम पुण्याचं सांस्कृतिक प्रतीक आहे. यात कोणतेही राजकीय स्टंट नाहीत. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि पुण्याच्या संस्कृतिक परंपरा जिवंत ठेवाव्यात,” असं आवाहन युवराज शाह यांनी केलं आहे. 

‘…तर कार्यक्रम बंद पाडू’; विरोधक करणाऱ्यांनी दिला इशारा

दरम्यान दुसरीकडे या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीनेही कार्यक्रम पूर्णनियोजित पद्धतीने आयोजित करणाऱ्या आयोजकांना थेट इशारा दिला आहे. जर कार्यक्रमात मुलींचा छेडछाड झाली तर आम्ही कार्यक्रम थांबवू आणि कायदेशीर कारवाईची मागणी करु असं म्हटलं आहे. “जर हिंदू कार्यक्रमात हिंदू भगिनींचा अपमान झाला तर तो सहन केला जाणार नाही,” असं हिंदू संघटनेचे हेमंत गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

शनिवार वाड्यात नमाज प्रकरण चर्चेत

19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा किल्ल्यात तीन महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शनिवारवाडा हे मराठा साम्राज्याचे प्रमुख ठिकाण असल्याने हा प्रकार हिंदू भावनांना धक्का देणारा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांकडून तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. आधीच मागील काही दिवसांपासून शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण चर्चेत असताना आता सारसबागेतील कार्यक्रमावरूनही वाद निर्माण झाल्याचं दिसतंय. 

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार