Solapur BJP Politics: सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षातील माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशावरून भाजपात नाराजीनाट्य रंगल आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा प्रवेशावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाचे विद्यमान आमदार तथा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा समर्थकांनी थेट पक्षाच्याच विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपात प्रवेश करत असल्याचे निश्चित होताच देशमुख समर्थकांचा संताप पाहायला मिळाला.
Add Zee News as a Preferred Source
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समवेत चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात. जेव्हा असे मोठे प्रवेश होतात त्यावेळी पार्टीने काहीतरी हिताचा विचार केला असेल गरजेचं राजकारण असणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून प्रवेश घेतील. आमदार सुभाष देशमुख देखील या प्रक्रियेत असून कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केलीय.
मात्र दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचच स्वागत केलय. मात्र सर्व प्रक्रिया होताना सर्वांनी सर्वांना विश्वासात घेणं महत्त्वाचं असून नवीन येणाऱ्यांनी किमान तीन-चार वर्ष तरी पक्षात काम केलं पाहिजे. तसेच सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवर नजर ठेवून पक्षात प्रवेश करत आहेत. उद्या जर जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आल्या तर मोठा एक गट तयार होईल.. हे सर्वजण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा होऊ देतील की नाही याबाबत माझ्या मनात शंका असल्याचं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलय.
निवडणूक आयोगाच्या नियमात सर्व बसून हे सर्व निघून गेले तर काय करणार आहे? सहा आमदार आमच्याकडे येत असतील जर उद्या काही गडबड झाली तर आम्हाला धोका आहे. तालुक्यातील नेते कार्यकर्ते काल येऊन माझ्याशी भांडत होते मात्र मी सांगितला आहे की पक्षाने निर्णय घेतलेला आहे. आपली एखाद्या जिल्ह्यात काही आता किंमत नसेल, कोणी मला ओळखत नसेल डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसा मी असेल… आता मी याच्यात मध्यस्थी करू शकत नाही कार्यकर्त्यांच्या बाबतीत हतबल झाल्याची भूमिका आ. सुभाष देशमुख यांनी मांडलीय.
या सर्व प्रकारावर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सडकून टीका केली असून जे पेरतं ते उगवण्याची खरी वेळ भाजपच्या कार्यकर्त्यावर आल्याची टीका त्यांनी केलीय. भाजपामध्ये अति हव्यास पणा करत इनकमिंग करण्याचं जे प्रमाण वाढत आहे त्याचाच फळ कार्यकर्त्यांना भोगण्याची वेळ येत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलीय.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाची हे धुसफूस समोर येण हे नक्कीच धोकादायक आहे. चार माजी आमदारांच्या पक्षात प्रवेश होण्याने भाजपाची ताकद वाढणार हे जरी निश्चित असलं तरी आता कार्यकर्त्यांची कशा पद्धतीने पक्ष समजत काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
FAQ
१. सोलापूर जिल्ह्यात भाजपामध्ये सध्या कोणत्या प्रकारचा वाद सुरू आहे?
सोलापूर जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षातील माजी आमदारांच्या भाजपात प्रवेशामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. विशेषतः काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रवेशावरून विद्यमान आमदार व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी पक्षाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यामुळे गटबाजी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून, आगामी निवडणुकीत हे धोकादायक ठरू शकते.
२. आमदार सुभाष देशमुख यांची या प्रवेशांबाबत भूमिका काय आहे?
आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपात येणाऱ्या सर्व नेत्यांचे स्वागत केले आहे, परंतु त्यांनी नवीन प्रवेशितांना किमान तीन-चार वर्षे पक्षात समर्पितपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करताना, प्रवेशांमुळे पक्षाची ताकद वाढेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, प्रक्रिया पारदर्शक असावी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे, अन्यथा पक्षाला धोका होऊ शकतो.
३. काँग्रेसकडून या वादावर काय प्रतिक्रिया आली आहे?
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजपावर सडकून टीका केली असून, “जे पेरतात ते उगवते” असे म्हणत पक्षातील अतिआकांक्षा व वाढत्या प्रवेशांमुळे कार्यकर्त्यांना फळ भोगावे लागत असल्याचे सांगितले. त्यानुसार, भाजपाची ही धुसफूस आगामी निवडणुकांसाठी धोकादायक असून, चार माजी आमदारांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढेल की कार्यकर्त्यांचा असंतोष वाढेल हे पाहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.