Home / संस्कृती / राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे सगळी गणितं बदलणार, ‘काही झालं तरी…’

राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे सगळी गणितं बदलणार, ‘काही झालं तरी…’

Congress on Thackeray Brothers: राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत मविआतला अंतर्गत कलह उफळला आहे. मुंबई मनपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा केला आहे. आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाहीत असं भाई जगताप यांनी जाहीर केलं आहे. आम्हाला उद्धव ठाकरेही नको आणि राज ठाकरेही नको असं भाई जगताप यांनी सांगून टाकलं आहे.  काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधी संजय राऊत यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यास विरोध करत असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली होती. 

Add Zee News as a Preferred Source

भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “आम्ही अजिबात यांच्यासोबत लढणार नाही. राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा छातीठोकपणे हे सांगितलं आहे. ही कार्यकर्त्याची लढाई असून, त्याला ती लढू दे. आम्ही ना शिवसेनेसोबत गेलं पाहिजे, उद्धव ठाकरेंसोबत गेलं पाहिजे. राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही”.  मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आणि लढलंच पाहिजे. आम्ही समितीसमोर हा मुद्दा मांडला आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे. 

सतेज पाटील यांनी भाई जगतापांच्या विधानावर भाष्य करताना म्हटलं आहे की, “स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय व्हावे अशी आमची अपेक्षा आहेत. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे त्यामुळे अनेक घडामोडी घडतील. अनेक ठिकाणी युती होईल, अनेक ठिकाणी स्वतंत्र लढावे लागेल. मात्र महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचं उद्दिष्ट आहे”. 

“महायुतीमध्येदेखील अनेक गट आहेत. मनसेबद्दल अजून चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा एकत्र लढत होतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळे लढत होतो. त्यामुळे आता देखील काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे. 

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत अधिकाराचा वापर करत असतो. त्यांचा तो निर्णय असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा, विधानसभा महायुतीला मिळालेल्या मताधिक्याने आम्ही जिंकलो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या भगवा डौलाने फडकेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. 

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार