Maharashtra Gold Mine : सोनं हा जागातील सर्वात मौल्यवान धातू आहे. जगभरात सोन्याच्या किंमतीचा भडका उडाला आहे. जगात अनेक देशांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. भारतातही मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड सारख्या राज्यांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. भारतातील सर्वात मोठी सुवर्णपेठ असलेल्या महाराष्ट्रात मात्र, एकही सोन्याची खाण नाही. मात्र, महाराष्ट्राच्या भूगर्भात सोन्यासह विविध मौल्यवान धातूंचा खजिनाच दडला आहे. हा खजिना बाहेर काढला तर राज्याच्या विकासासाठी मोठा हातभार लागणार आहे. कोकण आणि विदर्भात सोन्याच्या खाणी असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
Add Zee News as a Preferred Source
कोकण आणि विदर्भ… निसर्गाचं वरदान लाभलेले महाराष्ट्राचे दोन भूभाग. निसर्गानं या भागांवरची कृपादृष्टी कायम ठेवली आहे. कारण या दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. कोकणातील सिंधुदुर्ग आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लॉक आढळल्याची माहिती समोर आली होती.
चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. त्याशिवाय येथे तांबे, प्लॅटिनम, दुर्मिळ रथेनियम, रेडिअम, इरेडिअम असे मौल्यवान धातूही भूगर्भात लपले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागानं सोन्याच्या खाणी सापडल्याचा अहवाल दिला होता. तर राज्याच्या खनिकर्म विभागानं त्यानुसार चाचणी सुरू केली होती. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, लोह या खनिजासह सोनंही दडलं असल्याची माहिती उघड झालीय. चंद्रपूर जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लॉक आढळले आहेत. तसंच या भागात तांबही असून मोठ्या प्रमाणात सोनं मिळू शकतं असा अहवाल केंद्राच्या खनिकर्म विभागाने दिला होता. दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूगर्भात सोनं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी चाचणी सुरू झाल्याची देखील चर्चा रंगली होती.
निकषांनुसार सांगायचं झालं तर आधी झालेलं सर्वेक्षण हे G4 स्तरावरील होतं. त्यात पूर्व विदर्भाच्या जमिनीत सोन्याचा साठा असल्याचं स्पष्ट तर झालं, मात्र हे सोनं किती प्रमाणात आहे याबाद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ठोस निष्कर्षासाठी आणखी सर्वेक्षण व्हायला हवं असं भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हा सोन्याचा खजिना शोधण्यासाठी भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया(GSI-Geological survey of India)विदर्भच्या जमिनीचे सर्वेक्षण केले होते. जीएसआयच्या वैज्ञानिकांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. 1984-85 मध्ये अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर त येथील पुल्लर, परसोरी , थूतानबोरी आणि गडचिरोली येथील भूगर्भातील सर्वेक्षण केले.या सर्वेक्षणात सोन्याचा साठा असल्याची बाब पुढे आलीय. तसेच गडचिरोलीचे जिल्ह्यात घनदाट जंगल आणि डोंगरात सोन्याचा साठा आहे.
FAQ
1 महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी आहेत का?
महाराष्ट्रात सध्या सक्रिय सोन्याच्या खाणी नाहीत, तरीही राज्याच्या भूगर्भात सोन्यासह विविध मौल्यवान धातूंचा खजिना दडलेला आहे. कोकण आणि विदर्भ भागात सोन्याच्या खाणी असल्याचे अलीकडील अहवालात नमूद केले आहे. हे खनिजे बाहेर काढल्यास राज्याच्या विकासासाठी मोठा हातभार लागेल.
2 कोणत्या भागात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत?
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात (मिंझरी आणि बामणी भागात) सोन्याचे दोन ब्लॉक आढळले आहेत. तसेच, पूर्व विदर्भाच्या जमिनीत सोन्याचा साठा असल्याचे G4 स्तरावरील सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
3 चंद्रपूर जिल्ह्यात इतर कोणती खनिजे आहेत?
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. त्याशिवाय तांबे, प्लॅटिनम, दुर्मिळ रथेनियम, रेडिअम, इरेडिअम असे मौल्यवान धातूही भूगर्भात लपलेले आहेत. येथे सोन्यासह तांब्याचेही मोठे साठे आहेत.