Home / संस्कृती / भीतीदायक अंदाज खरा ठरतोय! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा

भीतीदायक अंदाज खरा ठरतोय! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ‘ऑक्टोबर हिट’चं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नागरिकांना अनेक आरोग्यआधारित समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातत्यानं होणाऱ्या या हवामान बदलांमध्ये आता नव्यानं आणखी एका सत्राची भर पडणार असून हे सत्र आहे मान्सूननंतरही बरसणाऱ्या वादळी पावसाचं. मंगळवार 21 ऑक्टोबरला सायंकाळनंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरसुद्धा इथं अपवाद ठरलं नाही. सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पाऊस परतला असून, यावेळी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊसधारा बरसणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अरबी समुद्राच्या आग्नेयेला केरळ, लक्षद्वीप किनाऱ्यानजीक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली आणखी वाढेल, तर अंदमान निकोबार बेटांनजीकच्या किनारपट्टी भागामध्येही कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून ते आणखी तीव्र होऊन त्यामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेशापर्यंत पावसाची हजेरी असेल असाही अंदाज आहे. 

पुढचे 4 दिवस पावसाचे… 

महाराष्ट्रात एकंदर पावसाचं प्रमाण पाहता पुढील 4 दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून, वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. यामध्ये कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यांसाठी नेमका कोणता अलर्ट? पाहा… 

22 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर,धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा (यलो अलर्ट)

23 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम ,यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर ,गोंदिया, गडचिरोली (यलो अलर्ट)

24 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोलीत पावसाचा यलो अलर्ट

25 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव पावसाचा येलो अलर्ट

FAQ

ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या उष्णतेचा (ऑक्टोबर हिट) परिणाम काय आहे?
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ऑक्टोबर हिटचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना डिहायड्रेशन, डोकेदुखी, थकवा आणि इतर आरोग्य समस्या होत आहेत. सातत्यपूर्ण हवामान बदलांमुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता का आहे?
बंगालच्या उपसागरात सक्रिय कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात वादळी पावसाची परती झाली आहे. याशिवाय, अरबी समुद्राच्या आग्नेयेला केरळ-लक्षद्वीप किनाऱ्याजवळ आणि अंदमान-निकोबार बेटांजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. 

पुढील 4 दिवस महाराष्ट्रात हवामान कसे राहील?
पुढील 4 दिवस (22 ते 25 ऑक्टोबर) राज्यात पावसाळी वातावरण राहील. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार