Home / संस्कृती / दीपोत्सव मनसेचा, जाहिरात सरकारची; MNSचा उल्लेख टाळल्यानं ‘हा तर कद्रूपणा’ म्हणत टीकेचा सूर

दीपोत्सव मनसेचा, जाहिरात सरकारची; MNSचा उल्लेख टाळल्यानं ‘हा तर कद्रूपणा’ म्हणत टीकेचा सूर

Mumbai MNS Shivaji Park Deepotsav : दिवाळीचं पर्व सुरू झालं असून, या आनंददायी अशा पर्वामध्ये विशेष आकर्षण ठरत आहे तो म्हणजे मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क इथं दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाणारा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा दीपोत्सव. दरवर्षीप्रमाणं यंदाजी मनसेनं दीपोत्सवाचं आयोजन केलं. या ठिकाणी ही रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनीच गर्दी केली, 

Add Zee News as a Preferred Source

येथील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले, व्हायरल झाले आणि पाहता पाहता आता थेट सरकारचच लक्ष या दीपोत्सवानं वेधलं. मनसेच्या दीपोत्सवाची थेट सरकारनं जाहिरात केली. पर्यटन विभागानं ही जाहिरात दिली असून खरी, मात्र त्यात मनसेचा ओझरताही उल्लेख नाही. इतकंच काय, तर या जाहिरातीतून दीपोत्सवाला येण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. ‘मुंबईतील दिवाळीची जादू अनुभवा… वगैरे वगैरे अशा ओळींमध्ये दीपोत्सवाचं वर्णन एका व्हिडीओसह सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. पण, या संपूर्ण वर्णनामध्ये कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनसेचं नाव नसल्यानं आता नवा वाद डोकं वर काढताना दिसत आहे. 

मनसेची पहिली प्रतिक्रिया… 

आश्चर्याची बाब म्हणजे मनसेनंही शासनाच्या या पोस्टची दखल घेत सरकारच्या या जाहिरातीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. हा सरकारच्या मनाचा कद्रूपणा असल्याचा हल्लाबोल मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे. 

मनसेची पहिली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…. 

‘दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे… हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील…’ असं लिहित, सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं…. अशा शब्दांत ‘मनसे अधिकृत’ या पेजवरून ही नाराजी अगदी मनसे शैलीत व्यक्त करण्यात आली. 

FAQ

मुंबईत शिवाजी पार्क येथे दीपोत्सव कोणत्या पक्षाने आयोजित केला आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. हा दिवाळीच्या पर्वातील एक प्रमुख आकर्षण ठरला असून, रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. 

सरकारने या दीपोत्सवाबाबत काय केले?
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने सोशल मीडियावर एक जाहिरात पोस्ट केली आहे. यात ‘मुंबईतील दिवाळीची जादू अनुभवा…’ अशा ओळींमध्ये शिवाजी पार्क दीपोत्सवाचे वर्णन करून एक व्हिडिओ शेअर केला असून, नागरिकांना या ठिकाणी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जाहिरातीमुळे कोणता वाद निर्माण झाला?
सरकारने मनसेच्या आयोजित कार्यक्रमाची जाहिरात केली, पण श्रेय न देता स्वतःची जाहिरात म्हणून प्रचार केल्याचा आरोप होत आहे. यामुळे ‘कद्रूपणा’चा मुद्दा उपस्थित झाला असून, हा वाद सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. 

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार