Sanjay Raut on Mahesh Kothare: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर मुंबई पालिकेत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला असून असं बोललात तर तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा दाबेल असं म्हटलं आहे, तसंच तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत असंही सुनावलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक महेश कोठारे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपाचं तोंडभरुन कौतुक केलं. भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपाचा भक्त आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं ते म्हणाले आहेत.
संजय राऊतांची टीका
“ते नक्की मराठी आहेत ना ते? मला शंका वाटत आहे. ते कोणत्याही पक्षाचे असूदेत. प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण ते एक कलाकार आहेत. तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तात्या विंचू तुम्हाला चावेल. तात्या विंचू अस्सल मराठी माणूस होता. असं बोललात तर रात्री येऊन चावा घेईल, गळा दाबेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महेश कोठारे नेमकं काय म्हणाले?
“या कार्यक्रमांना येऊन आनंद होतो. हा आपल्या घऱचा कार्यक्रम आहे. भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपाचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. सध्याचं 15 वं वर्ष आहे, पण 16 व्या वर्षाचं जे दिवाळी सेलिब्रेशन असेल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे,” असं महेश कोठारे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “मला आठवतं पियुष गोयल आले होते. त्यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की, आपण फक्त एक उमेदवार देत नाही आहोत, तर मंत्री निवडून देत आहोत. तसंच यावेळी आपल्याला या परिसरातून नगरसेवक निवडून द्यायचे आहेतच. भाजपा नवी लोकांना संधी देत असतं, त्यामुळे कदाचित महापौरही इथला असू शकतो.”
FAQ
1) महेश कोठारे यांनी भाजपाबद्दल काय म्हटलं?
उत्तर: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मागाठाणे येथे आयोजित भाजपाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे जाहीर केले. त्यांनी म्हटले की, “भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपाचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे.” तसेच, मुंबई महानगरपालिकेत कमळ (भाजपाचा प्रतीक चिन्ह) फुलेल असा विश्वास व्यक्त केला.
2) महेश कोठारे यांनी मुंबई पालिकेबद्दल काय म्हटले?
उत्तर: कोठारे यांनी सांगितले की, सध्याचे १५ वे वर्ष आहे, पण १६ व्या वर्षातील दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान मुंबईवर कमळ फुलेल असेल याची खात्री आहे. तसेच, पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, भाजपा फक्त उमेदवार देत नाही तर मंत्री निवडून देते. यावेळी या परिसरातून नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आणि भाजपा नवीन लोकांना संधी देते, त्यामुळे महापौरही इथला असू शकतो.
3) संजय राऊत यांनी महेश कोठारे यांना काय टोला लगावला?
उत्तर: शिवसेना (उद्धव) चे खासदार संजय राऊत यांनी कोठारे यांच्या वक्तव्यावर टीका करत म्हटले की, “ते नक्की मराठी आहेत ना? मला शंका वाटत आहे. ते कोणत्याही पक्षाचे असू शकतात. प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण ते एक कलाकार आहेत. तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तात्या विंचू तुम्हाला चावेल. तात्या विंचू अस्सल मराठी माणूस होता. असं बोललात तर रात्री येऊन चावा घेईल, गळा दाबेल.” यातून त्यांनी मराठी असण्यावर आणि कलाकाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.