Home / संस्कृती / ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणांमध्ये आरोपांचे फटाके, नेमके आरोप काय?

ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणांमध्ये आरोपांचे फटाके, नेमके आरोप काय?

Bachchu Kadu Vs Rana : एकीकडे राज्यात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. तर तिकडे अमरावतीत पारंपरिक राजकीय विरोधक बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरूवात झाली आहे.  हे आंदोलन करून बच्चू कडू हे सरकारला ब्लॅकमेल करून पुनर्वसन करण्यासाठी हातापाया पडत असल्याचं हल्लाबोल रवी राणा यांनी केला आहे.

Add Zee News as a Preferred Source

अमरावतीच्या राजकारणात माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्यांच्यात झालेली राजकीय आरोप-प्रत्यारोप राज्यात चर्चेचा विषय बनलो होता. आता तर ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये जोरदार राजकीय आरोपांचे बॉम्ब फुटायला सुरूवात झाली आहे. 

‘कडूंचं आंदोलनाआडून सरकारचं ब्लॅकमेलिंग’

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून काढण्याची भाषा केली होती. त्यावरून आता रवी राणा यांनी बच्चू कडूंवर पलटवार केला आहे. हे आंदेलन करून बच्चू कडू सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा हल्लाबोल रवी राणा यांनी केला आहे. माझं राजकीय पुनर्वसन करा मला विधानपरिषद द्या असं म्हणत बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या हातापाया पडल्याचा दावा करत राणांनी कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे आमदारकी गेल्यावर काहींना शेतकरी आणि दिव्यांगांची आठवण झाली अशा शब्दांत माजी खासदार नवनीत राणा यांनी नाव न घेता बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे. मंत्री आणि आमदार राहिलेल्यांची नौटंकी सुरु असल्याचा हल्लाबोलही नवनीत राणा यांनी केला आहे.

ऐन दिवाळीत राणा-बच्चू कडू आमने-सामने

अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्यामधील वाद काही नवा नाहीय. निवडूका आल्या की वाद प्रचंड विकोपाला जातो हे आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणूकत पाहिलं आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आता पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ऐन दिवाळीतच कडू आणि राणा यांच्यामध्ये एकमेकांवर आरोपांचे फटाके डागायला सुरूवात झालीय.

FAQ

अमरावतीतील बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमधील सध्याचा वाद काय आहे?

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत पारंपरिक राजकीय विरोधक माजी मंत्री बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य (रवी राणा आणि नवनीत राणा) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राणा दाम्पत्याने कडू यांच्यावर सरकारला ब्लॅकमेल करून राजकीय पुनर्वसन मागण्याचा आरोप केला आहे, तर कडू यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या ऐवजी आमदारांना ‘कापून काढा’ अशी भाषा केली होती.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर काय आरोप केले?

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आंदोलनाच्या नावाखाली सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा हल्लाबोल केला आहे. त्यांचा दावा आहे की कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातापायाला पडून विधानपरिषदेची सदस्यता मागितली आहे. हे राजकीय पुनर्वसनासाठीचे प्रयत्न असल्याचे राणा म्हणतात.

नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर काय टीका केली?

नवनीत राणा यांनी नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला असून, आमदारकी गेल्यानंतर काहींना शेतकरी आणि दिव्यांगांची आठवण होते असे म्हटले. मंत्री आणि आमदार राहिलेल्यांची ‘नौटंकी’ सुरू असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

क्रिकेट थेट

राशिफल

शेयर बाज़ार