Mumbai Metro Line 11 : आरे भुयारी मेट्रो 3′ मार्गिका 9 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने, आरे- कफ परेडदरम्यान धावू लागली आहे. या मार्गिकेवरील आरे- आचार्य अत्रे चौक टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, ‘मेट्रो 3’ पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या मेट्रोलाईनवर दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. दक्षिण मुंबईतील CSMT मेट्रो स्थानकावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळते. आता हेच CSMT मेट्रो स्टेशन गेम चेंजर ठरणार आहे. कारण आता डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियापर्यंत मेट्रो धावणार आहे. मुंबईच्या अती गर्दी असलेल्या भायखळा, नागापाडा, भेंडीबाजार सारख्या एरियामधून ही मेट्रो 11 धावणार आहे. ‘मेट्रो 3’ आणि मेट्रो 11 मार्गिकेचा एंटरचेंज याच CSMT मेट्रो स्टेशन असणार आहे.
Add Zee News as a Preferred Source
आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया असा मेट्रो 11 चा मार्ग असेल. हा भुयारी मेट्रो प्रक्लप आहे. याचा प्रस्ताव केंद्राकडे सोपवण्यात आला आहे. आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो 11 मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) या मार्गिकेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे.
24 हजार कोटींचा हा मेट्रो 11 प्रकल्प आहे. या मार्गिकेसाठी आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील 16 हेक्टर जागेवर कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आहे. मेट्रो प्रकल्पाची सध्याची अपडेट म्हणजे MMRCL ने मुंबई मेट्रो लाईन 11 (अनिक डेपो ते गेटवे ऑफ इंडिया) साठी अंतरिम सल्लागार नेमण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. आणिक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या 16 किमीच्या संपूर्ण भूमिगत मुंबई मेट्रो लाईन 11 ला महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
मेट्रो 11 मार्गावर असलेली स्थानके
• आणिक नगर बस डेपो
• वडाळा आगार
• CGS कॉलनी
• गणेश नगर
• बीपीटी हॉस्पिटल
• शिवडी
• गवत बंदर
• दारुखाना
• भायखळा
नागपाडा जंक्शन
• भेंडी बाजार
• सीएसएमटी मेट्रो (लाइन-३/एक्वा लाइनसह अदलाबदल)
• हॉर्निमन सर्कल
• गेटवे ऑफ इंडिया (श्यामा प्रसाद मुखर्जी चौक)
FAQ
1 मेट्रो लाईन ११ काय आहे आणि तिचा मार्ग काय असेल?
मेट्रो लाईन ११ ही आणिक डेपो ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची पूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. हा १६ किमी लांबीचा प्रकल्प असून, तो दक्षिण मुंबईतील गर्दीच्या भागांमधून (जसे भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार) धावेल. सीएसएमटी मेट्रो स्थानकावर मेट्रो ३ सोबत एंटरचेंज सुविधा असेल.
2 मेट्रो लाईन ११ च्या विकासाची सद्यस्थिती काय आहे?
महाराष्ट्र सरकारने या मार्गिकेला यापूर्वीच मान्यता दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) ने अंतरिम सल्लागार नेमण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळानेही हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
3 मेट्रो लाईन ११ ची किंमत किती आहे?
हा २४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यासाठी आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आहे.